सातारा : सातार्यातील छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी 7 कोटी 37 लाख 58 हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाकडून यंत्र व साधनसामुग्री खरेदी करता येणार आहे.
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास सन 2025- 26 या आर्थिक वर्षात राज्य योजनाअंतर्गत उपलब्ध अनुदानातून यंत्रसामुग्री व साधनसामुग्री खरेदी करण्यास 7 कोटी 37 लाख 58 हजार रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. याबाबतचा शासन आदेश अवर सचीव सुधीर शेट्टी यांनी काढला आहे.
शासनाकडून मंजूर झालेल्या निधीमधून अत्याधुनिक अशी यंत्रसामुग्री व साधनसामुग्री खरेदी केली जाणार आहे. त्याचा उपयोग रुग्णायलयात येणार्या रुग्णांना होणार आहे. या साधनसामुग्रीमुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दर्जेदार सेवा सुविधामध्ये आणखी भर पडणार आहे. या निधीमुळे छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कात टाकणार आहे.