सातारा : अस्तित्व लपवल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 13 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास शाहरुख शमशुद्दीन पठाण रा. शनिवार पेठ, सातारा हा सेव्हन स्टार समोर असलेल्या पानपट्टीच्या आडोशास स्वतःचा चेहरा लपवून, अपराध करण्याच्या उद्देशाने बसल्याचे निदर्शनास आले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार देशमुख करीत आहेत.