झेडपीसमोर रस्त्यासाठी उपोषण

by Team Satara Today | published on : 14 September 2024


सातारा : फलटण तालुक्यातील निंभोरे येथील ग्रामपंचायत वहिवाटीचा रस्ता अडवण्यात आला असून त्यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी सातारा जिल्हा परिषद कार्यालयासमोर कांबळे कुटुंबियांनी बेमुदत उपोषण सुरु केले आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाला कुटुंबियांनी निवेदन दिले. 

कुटुंबियांना जाण्या-येण्यासाठी असलेल्या ग्रामपंचायतीच्या रस्त्याची काही समाजकंटकांनी अडवणूक केली आहे. रस्त्याबाबत ग्रामपंचायतीने ठराव केला आहे. फलटण पंचयात समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी निंभोरे ग्रामपंचायतीला अतिक्रमण काढण्याबाबत आदेश दिले होते. तरीदेखील ग्रामपंचायतीने कोणतीही कारवाई केलेली नाही. आम्हांला जाण्या-येण्यासाठी असलेला रस्ता खुला करण्यात यावा. या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. 

या उपोषणास कमलाकार कांबळे, शोभा कांबळे, कार्तिक कांबळे, गौतमी कांबळे, रामचंद्र कांबळे, लक्ष्मी कांबळे बसले आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शिर्डीत जुनी पेन्शन संघटनेचे १५ रोजी पेन्शन महाअधिवेशन
पुढील बातमी
मराठी कलाकारांकडून पंढरपुरात 25 तास अविरत भजन

संबंधित बातम्या