गाझीपूर : बदलापूर अल्पवयीन मुलींच्या अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदेचा मुंबई पोलिसांनी एन्काऊंटर केला. हे प्रकरण ताजं असताना गाझीपूरमध्ये, यूपी एसटीएफ आणि स्थानिक पोलिसांनी आरपीएफ जवानांच्या हत्येमध्ये सामील असलेल्या 1 लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या जाहिद या गुन्हेगाराची हत्या केली आहे.
उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यात 1 लाख रुपयांचे बक्षीस असलेला गुन्हेगार जाहिद उर्फ सोनू यूपी एसटीएफ आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकासह त्याचा एन्काऊंटर करण्यात आला. दिलदारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जमानिया-दिलदारनगर रस्त्यावर ही चकमक झाली. चकमकीत मारला गेलेला गुन्हेगार आरपीएफ जवानांच्या हत्येप्रकरणी वाँटेड होता.
दरम्यान, 20 ऑगस्ट रोजी गाझीपूरमध्ये दोन आरपीएफ जवान शहीद झाले होते. गहमर पोलीस स्टेशन हद्दीतील बकानिया गावाजवळ दोन्ही आरपीएफ जवानांचे मृतदेह सापडले. दोन्ही आरपीएफ कर्मचारी पीडीडीयू रेल्वे यार्ड पोलीस ठाण्यात तैनात होते आणि ते बारमेर एक्स्प्रेसने मोकामा प्रशिक्षण केंद्राकडे जात होते. दारू तस्करांनी आरपीएफ जवानांना बेदम मारहाण करून दोघांनाही ट्रेनमधून फेकून दिले होते. आरपीएफ जवान प्रमोद सिंग आणि जावेद अहमद यांची हत्या करून आरोपी फरार झाला होता. या प्रकरणात 5 गुन्हेगारांना यापूर्वीच अटक करण्यात आली. तर एका गुन्हेगाराला चकमकीत जखमी झाल्यानंतर अटक करण्यात आली आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी एक लाखाचे बक्षीस जाहीर केले होते. याचदरम्यान सोमवारी रात्री उशिरा झालेल्या चकमकीत ठार झालेला गुन्हेगार मोहम्मद जाहिद उर्फ सोनू याच्यावर एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. चकमकीत ठार झालेला गुन्हेगार हा बिहारमधील पाटणा जिल्ह्यातील फुलवारी शरीफ येथील रहिवासी होता. या चकमकीत दोन पोलीस हवालदारही जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक सीएचसीमध्ये उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी, पोलीस अधीक्षक इराज राजा यांनी सांगितले की, अलीकडेच बारमेर एक्स्प्रेसमध्ये दोन आरपीएफ जवानांची दारू तस्करांनी हत्या करून त्यांचे मृतदेह रेल्वे रुळावर फेकून दिले होते. या प्रकरणी पोलिसांनी यापूर्वीच पाच आरोपींना कारागृहात पाठवले होते. खबऱ्याच्या माहितीवरून दारू तस्करीचा मुख्य सूत्रधार आणि एक लाखाचे बक्षीस असलेला जाहिद हा गहमर परिसरात असल्याची माहिती मिळाली. या माहितीनंतर यूपी एसटीएफ आणि गहमर पोलिसांनी घेराव घातला आणि आरोपींच्या बाजूने गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात आरोपी जेहरीला गोळी लागली. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. मयत गुन्हेगारावर एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. या चकमकीत दोन जवानही जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
रेकी करून ट्रॅक्टर चोरी करणार्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश |
लाडकी बहीण योजनेमुळे शरद पवारांच्या पोटात दुखतंय |
पाचगणी येथे पुरुषोत्तम जाधव यांच्या जनसंवाद यात्रेचे स्वागत |
अवैध फटाका विक्री करणार्या दोघांवर गुन्हा |
पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे भटक्या बैलाला रेबीजचा संसर्ग |
सैनिकांचे प्रश्न सोडविण्याची ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातच |
रचनात्मक समाजासाठी बहुआयामी व्यक्तिमत्व दिशादर्शक : अभिनेते स्वप्निल जोशी |
गोडोलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध |
घराणेशाहीची ‘पाटील’की मोडीत काढण्यासाठीच विधानसभेच्या मैदानात : पुरुषोत्तम जाधव |
खाजगी फायनान्स कंपन्यांचा मनमानी कारभार थांबवा |
लाडक्या बहीण योजनेचा महायुतीमध्ये श्रेयवाद |
दैत्यनिवारणी देवीची नवरात्रोत्सवातील शुक्रवारी बांधण्यात आलेली महापूजा |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हे |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एमआयडीसी परिसरातून दुचाकीची चोरी |
सैनिकांचे प्रश्न सोडविण्याची ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातच |
रचनात्मक समाजासाठी बहुआयामी व्यक्तिमत्व दिशादर्शक : अभिनेते स्वप्निल जोशी |
गोडोलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध |
घराणेशाहीची ‘पाटील’की मोडीत काढण्यासाठीच विधानसभेच्या मैदानात : पुरुषोत्तम जाधव |
खाजगी फायनान्स कंपन्यांचा मनमानी कारभार थांबवा |
लाडक्या बहीण योजनेचा महायुतीमध्ये श्रेयवाद |
दैत्यनिवारणी देवीची नवरात्रोत्सवातील शुक्रवारी बांधण्यात आलेली महापूजा |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हे |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एमआयडीसी परिसरातून दुचाकीची चोरी |
मसाप शाहुपुरी शाखेच्यावतीने पोवई नाक्यावर साखर वाटप |
महिला अडचणीत असताना गृह खात्याच्या झोपा |
हिंदू बहुजन सन्मान यात्रेचे सातारा शहरात उस्फुर्त स्वागत |
श्वानांचे मुखवटे झळकवून गणेश वाघमारे यांचे पालिकेसमोर आंदोलन |
सालोशी येथील बांबू हस्तकला प्रशिक्षणाला उस्फूर्त प्रतिसाद |