सातारा : शहरातील सेवन स्टार इमारती परिसरात अंधाराचा फायदा घेऊन स्वतःचे अस्तित्व आणि चेहरा लपवून अपराध करण्याच्या उद्देशाने बसल्याप्रकरणी विजय राजेंद्र सरतापे (वय २६ वर्ष रा. पानमळाघर म्हसवड,सातारा) याच्या विरोधात पोलीस कॉन्स्टेबल रोहित पवार यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रतापसिंह नगर येथील सुविधा अपार्टमेंट समोर रिक्षा स्टॉपच्या शेजारी रोहित जितेंद्र भोसले (वय २७ वर्ष रा. प्रतापसिंहनगर,सातारा) याला दोन वर्षासाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपार केले असताना देखील पोलीस अधीक्षक सातारा अथवा महाराष्ट्र शासन यांच्या लेखी परवानगीशिवाय आदेशाचा भंग करून वावरत असल्याप्रकरणी सातार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्रनाथ माने यांनी सातार शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार खाडे आणि पोलिस हवलदार पवार करत आहेत.