सोनगीरवाडी खून प्रकरणातील संशयित केवळ तीन तासांत जेरबंद

वाई पोलिसांची कारवाई

by Team Satara Today | published on : 19 February 2025


वाई : सोनगीरवाडी, ता. वाई येथे एकाचा अमानुषणे मारहाण करून खून केल्याची घटना घडली. यामुळे वाईसह तालुक्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणातील दोनही संशयितांना गजाआड करण्यात वाई पोलिसांना यश आले आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, दि. 18 रोजी रात्री 10 च्या सुमारास राज अरुणकुमार सिंग, वय 26, सध्या रा. श्रीस्वामी समर्थ अपार्टमेंट, तीसरा मजला साक्षीविहार, जगताप हॉस्पीटल जवळ, वाई, ता. वाई, जि. सातारा, मुळ रा. जसवली, ता. महानंदपुर, जि. नवादा, बिहार हा आणि त्याचे मित्र प्रणित गायकवाड, रा. परखंदी, ता. वाई, जि. सातारा, शाकीर खान, रा. निळाकट्टा, सोनगीरवाडी, वाई, ता. वाई, जि. सातारा, विनोद साळुंखे व हर्षवर्धन कारेकर हे सोनगीरवाडी, वाई येथील बाभळवनात दारू पिण्यासाठी बसले होते. दरम्यान, शाकीर याने हर्षवर्धन याच्या कानफाटात मारल्याने तो तिथून निघून गेला. त्यानंतर राज, प्रणित व शाकीर यांच्यात चेष्टामस्करीतून वाद सुरु झाला. हा वाद विकोपाला गेल्याने प्रणित याने राज याच्या डोक्यात बिअरच्या दोन बॉटल फोडल्या. शाकीर व प्रणित यांनी मिळून बांबूने राज याला जबर मारहाण केली. विनोद याने भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही मारहाण करण्यात आली.

या मारहाणीत राज रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला होता. त्यानंतर प्रणित व शाकीर या दोघांनी तेथून दुचाकीवरून धुम ठोकली. घडलेला प्रकार विनोद याने राजचा भाऊ अश्विनी सिंग याला दि. 19 रोजी पहाटे 3 वाजता फोन करून सांगितला. त्यांनतर अश्विनी याने घटनास्थळावर जाऊन पाहिले. राज याला ऍम्बुलन्स मधून ग्रामीण रुग्णालय वाई येथे नेले असता डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. याप्रकरणी प्रणित गायकवाड व शाकीर खान यांनी राज सिंग याला जबर मारहाण करत त्याचा खून करून पळून गेल्याची तक्रार अश्विनी सिंग याने वाई पोलीस ठाण्यात दिली आहे.

याबाबतचा गुन्हा वाई पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर प्रभारी अधिकारी श्याम पानेगावकर यांनी दोन पोलीस पथके तयार करून त्यांना आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना केले यानंतर तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेच्या आधारे दोघेही त्यांच्याकडील दुचाकीवरून परखंदी रोड ने पळून गेल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार तपास पथकाने परखंदी घाटात या संस्थेचा शोध घेतला असता ते डोंगरात लपून बसल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर त्यांना सापळा लावून शिताफीने ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.

संशयितांना न्यायालयासमक्ष सादर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून अधिक तपास वाई चे परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक श्याम पानेगावकर करीत आहेत.

या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, वाई पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्याम पानेगावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी, पोलीस उपनिरीक्षक बिपिन चव्हाण, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, अमित सुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुकुंद माळी, पोलीस हवालदार मदन वरखडे, धीरज यादव, अजित जाधव, पोलीस कॉन्स्टेबल रुपेश जाधव, राम कोळेकर, गोरख दाभाडे, राम कोळी, नितीन कदम, प्रसाद दुदुस्कर, हेमंत शिंदे, विशाल येवले, धीरज नेवसे, सागर नेवसे, श्रावण राठोड, विशाल शिंदे, अक्षय नेवसे, ज्ञानेश्वरी भोसले, शितल कुदळे, स्नेहल सोनवणे यांनी सहभाग घेतला.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
२ मार्चला मुक्ता साळवे साहित्य संस्कृती संमेलन
पुढील बातमी
परताव्याच्या आमिषाने सुमारे 11 कोटींची फसवणूक

संबंधित बातम्या