सातारा : मयत व्यक्तीचे बनावट मृत्युपत्र तयार करून सदर बाजार येथील जमिनीची भूखंड लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघां विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी अमिन बद्रुद्दिन आगा (वय 65 ) हे सेवानिवृत्त शिक्षक असून यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फहाद नजीर खान (रा. सदरबाजार सातारा), सिद्धेश्वर करवैय्या स्वामी (रा. ८०७ शनिवार पेठ) , प्रताप धनंजय शिंगटे (वय 30, रा. देशमुख कॉलनी सातारा) ,एड. घनश्याम महादेव फरांदे (रा. तामजाई नगर),चौघांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, फिर्यादी अमीन आगा यांचे मामा कबीर आयुब खान हे 19 जानेवारी 2014 रोजी मयत झाले होते.असे असतानाही संबंधित चौघांनी 27 जुलै 2014 रोजी त्यांचे बनावट मृत्युपत्र तयार करून ते खरे असल्याचे भासवले आणि 449/46, 491/37, 491/34, प्लॉट नं ५, प्लॉट नं 26 यासारखे काही भूखंड ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. तशी नोंदही भूमापन कार्यालय येथे नोंद केल्याचा प्रयत्न सुरू होता. ही बाब फिर्यादी यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक एस. एस. गवळी अधिक तपास करत आहेत.