सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या व घटनेचे शिल्पकार आणि साताऱ्यात शैक्षणिक प्रारंभ करणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त साताऱ्यात विविध विधायक उपक्रम राबवण्यात येत आहे. तसेच अभिवादन कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू झालेली आहे.
साताऱ्यातील तरुणाई विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यासाठी व समतेचा नारा संपूर्ण देशात पोहोचवण्यासाठी सर्व जाती धर्मातील युवक व युवती व आंबेडकरवादी कार्यकर्ते स्वयंपूर्ण रक्तदान करणार आहेत. महामानवास करूया अनोखे अभिवादन होणार आहे. सर्वधर्मसम भाव... राखू या रक्तातून हमीभाव.. असा नारा देण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यात व परिसरात सद्य परिस्थितीत रुग्णालयांमध्ये नियोजित शस्त्रक्रिया, अनेक गंभीर आजारांनी पिडीत नागरिक यांना मोठ्या प्रमाणात रक्ताची आवश्यकता आहे. मागणीच्या प्रमाणात रक्तपेढ्यांमधून रक्ताचा पुरवठा होत नाही. ही वस्तुस्थिती आहे. युगपुरुषांच्या विचाराप्रमाणे मानवता धर्म पाळण्यासाठीच युवा पिढीने पुढाकार घेतला आहे.
यासाठी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६९ व्या महापरिनिर्वाणदिना निमित्ताने समता सैनिक दल, शाखा सातारा व सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालय, सातारा" यांच्या माध्यमातून हे रक्त गरजू रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांपर्यंत देण्यात येणार आहे. साताऱ्यातील महामानव डॉ. आंबेडकर पुतळ्या नजिक रक्तदान व शैक्षणिक साहित्य भेट असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. सामाजिक संस्था त्याचबरोबर फुले- शाहू- आंबेडकर विचाराचा वारसा जपणाऱ्या सर्वांचे योगदान यानिमित्त एकजुटीने होणार आहे. महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमानिमित्त सातारा नगरपालिका व सामाजिक न्याय विभाग, जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा व विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चांगल्या पद्धतीने नियोजन केले आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचलेले आहेत. परंतु, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यकर्ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे संविधानाचे वाटप करून या राज्यकर्त्यांना त्याच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यात येणार आहे.
साताऱ्यातील या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील वामन म्हस्के,अँड. विलास वहागावकर, अनिल वीर, अजित जगताप, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गटाचे राज्य प्रदेश महासचिव दादासाहेब ओव्हाळ, रिपब्लिकन सेना महाराष्ट्र नेते रमेश अनिल उबाळे, वंचित बहुजन आघाडीचे अमोल गंगावणे, चंद्रकांत खंडाईत, संजय गाडे, पूजा बनसोडे, गणेश भिसे, समता सैनिक दलाचे प्रज्वल मोरे, अरुण पोळ, श्याम रोकडे, सामाजिक कार्यकर्ते अरुण पवार, आदित्य गायकवाड, गणेश कारंडे, ऋषिकेश गायकवाड, उमेश खंडझोडे, दामिनी निंबाळकर, राजू ओव्हाळ, सलीम बागवान, सलीम शेख, यांच्यासह शेकडो भीमसैनिक व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.