सातारा : अवैध दारू प्रकरणी सातारा शहर सह तालुका पोलिसांनी दोन जणांवर कारवाया केल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 20 रोजी सदर बाजार येथील भीमाबाई आंबेडकर नगर परिसरात अवैधरित्या दारू विक्री करताना तेथीलच राजू बाबुराव यादव आढळून आले. त्यांच्याकडून पंधरा हजार शंभर रुपये किंमतीची हातभट्टीची तयार दारू हस्तगत करण्यात आली आहे.
दुसऱ्या घटनेत, सातारा-मेढा रस्त्यावरील नुने गावच्या हद्दीत सचिन ज्ञानदेव चव्हाण रा. वेचले, ता. सातारा हे 6720 किंमतीच्या देशी दारूच्या बाटल्यांची अवैधरित्या वाहतूक करताना आढळून आले. त्यांच्याकडून दारू सह एक्सेस मोपेड गाडी असा एकूण 51 हजार 720 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.