कोरेगावात समाजोपयोगी उपक्रमांचा धडाका

by Team Satara Today | published on : 07 August 2025


कोरेगाव : कोरेगाव मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी कोरेगाव शहरातील रेल्वे स्टेशननजीक जीतराज मंगल कार्यालयात आ. महेश शिंदे हे शुभेच्छा स्वीकारणार आहेत.

कोरेगाव विकास आघाडी, कोरेगाव नगरपंचायत आणि आ. महेशदादा शिंदेसाहेब विचार मंचच्या वतीने सोमवार दि. 4 ते शनिवार दि. 9 ऑगस्ट दरम्यान कोरेगाव शहरात विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांच्यावतीने अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना गणवेश व खाऊ वाटप करण्यात आले. गुरूवारी सचिन बर्गे व नगरसेविका संजीवनी बर्गे यांच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच भाजप महिला आघाडी व शहर बेटी बचाओ, बेटी पढाओ समितीच्यावतीने माहेश्वरी मंगल कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 1 वाजता महागाव, ता. सातारा येथे राजाभाऊ बर्गे यांच्यावतीने वृध्दाश्रमात साड्यांचे वाटप व मिष्ठान्न भोजन दिले जाणार आहे. सायंकाळी वाघजाईवाडी येथील आशाग्राम मतिमंद विद्यालयात विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन वाटप केले जाणार आहे.

शुक्रवार दि. 8 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता संतोष बर्गे व नगरसेविका शीतल संतोष बर्गे यांच्यावतीने उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात वृक्षारोपण केले जाणार आहे. 11 वाजता शिवसेना शहरप्रमुख महेश बर्गे यांच्यावतीने लक्ष्मीनगर येथील जि. प. शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप व खाऊचे वितरण केले जाणार आहे. जिल्हा नियोजन समिती सदस्य राहूल बर्गे यांच्यावतीने सुभाषनगर येथील जि. प. शाळेत खुर्च्यांचे वाटप केले जाणार आहे.

माजी उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे यांच्यावतीने सुभाषनगर शाळेतील अंतर्गत रस्त्याचे लोर्कापण केले जाणार आहे. शनिवार दि. 9 रोजी महेश बर्गे व नगराध्यक्षा दीपाली बर्गे यांच्यावतीने बसस्थानक आवारात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या व्यापारी पेठेत साखळी पुलानजीक जुन्या प्रांत कार्यालय परिसराचे सुभोभिकरण आणि वृक्षारोपण केले जाणार आहे. दुपारी 4 वाजता सुनील बर्गे यांच्यावतीने सुभाषनगर विभागासाठी भाजी मंडईचा शुभारंभ केला जाणार आहे. वाढदिवसानिमित्त येणार्‍या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ न आणता एक रोप आणून वृक्षारोपण चळवळीस हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कास पठार कार्यकारी समितीकडून हंगामाचे नियोजन
पुढील बातमी
खंडाळ्यात 'एस कॉर्नर'ला ब्रेकफेल ट्रकचा थरार

संबंधित बातम्या