रायगड : गणपतीसाठी चाकरमानी कोकणात रवाना झाले आहेत. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी दिसत आहे. आज शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी मुंबई गोवा महामार्गावर ही वाहतूक कोंडी दिसत आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले आहेत. अनेक ठिकाणी गाड्यांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. त्यात रस्त्याची वाईट अवस्था असल्याने आणखी मनस्ताप चाकरमान्यांना सहन करावा लागत आहे. पनवेल पासून महाडपर्यंत अनेक ठिकाणी प्रवासात विघ्न येत असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहेत.
मुंबई- गोवा हायवेवर खारपाडा, वडखळ, गडब, नागोठणे, सुकेळी खिंड, पुई, कोलाड नाका ते कोलाड रेल्वे स्टेशन या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दिसून येत आहे. अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला भेटत आहेत.
सुकेळी खिंड उतरल्यावर खांब गाव ते कोलाड रेल्वे स्टेशनपर्यंत पहाटे पासून मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. खांब ते कोलाड स्टेशन 5-6 किलोमीटर परिसरात मोठया प्रमाणात प्रवासी छोटी वाहने, ST बसेस, दुचाकीस्वार अडकले आहेत. मुंगीच्या गतीने त्यांना पुढे सरकावं लागत आहे.
सुकेळी खिंड ते कोलाड स्टेशनपर्यंत वाहतूक पोलीस, रायगड पोलीस व स्वयंमसेवकांची टीम रस्त्यावर वाहतुक सुरळीत करताना दिसत आहे. शनिवारी गणपतीचे आगमन होणार आहे. त्यामुळे बरेचसे चाकरमानी आजच गावाकडे निघाले आहेत. गुरूवारच्या तुलनेत शुक्रवारी जास्त प्रमाणात वाहतूक कोंडी दिसत आहे. अनेकांनी रेल्वेने जाणे पसंत केले आहे. तर काही जण मुंबई पुणे हायवेने रवाना झाले आहेत. पण मोठ्या प्रमाणात चाकरमानी मुंबई गोवा महामार्गाचाच वापर करताना दिसत आहेत.
यावाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून अनेक जण मुंबई पुणे एक्सप्रेस वे ने खोपोली मार्गे पाली माणगाव गाठत आहेत. हा एकेरी रस्ता असला तरी तुलनेने कमी रहदारी आहे. त्यामुळे माणगावपर्यंतचा प्रवास सुरळीत आणि तेवढाच वेगवान होत आहे. मात्र पाली आणि माणगाव इथे सर्व वाहने एकत्र येत असल्याने इथंही वाहतूक कोंडी दिसून येत आहे. माणगावची बाजारपेठ असल्याने इथं हायवे वरून येणारी वाहानं आणि स्थानिक वाहनं यामुळे प्रचंड कोंडी होत आहे. त्यामुळे शहरातून बाहेर पडण्यासाठी तासन तास वेळ लागत आहे. ही कोंडी सोडवण्यासाठी स्थानिक वाहतूक पोलीस काम करत आहेत.
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनेत तीन युवती बेपत्ता |
अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
माझ्या माघारीचे दोर जनतेने केव्हाच कापलेत : अमितदादा कदम |
सातारा शहरात विसर्जन मिरवणूक तयारीची लगबग |
तृतीयपंथी प्रेयसीचा प्रियकराने काढला कायमचा काटा |
मूकबधीर विद्यार्थ्यांचा माण नदीपात्रातील बंधाऱ्यात बुडून मृत्यू |
मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा |
कराड परिसरातील 92 गुन्हेगार हद्दपार |
सातारा तालुक्यातून १२ इसम हद्दपार |
तृतीयपंथी प्रेयसीचा प्रियकराने काढला कायमचा काटा |
मूकबधीर विद्यार्थ्यांचा माण नदीपात्रातील बंधाऱ्यात बुडून मृत्यू |
मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा |
कराड परिसरातील 92 गुन्हेगार हद्दपार |
सातारा तालुक्यातून १२ इसम हद्दपार |
तडीपार सराईत दुचाकी चोरटा जेरबंद |
लिंगायत समाज हिंदू धर्माचा अविभाज्य घटक : खासदार अजित गोपछडे |
साहेबराव पवार यांचे विचार मार्गदर्शक : पृथ्वीराज चव्हाण |
शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |