तामजाईनगर परिसरात महिलेस धमकी देत घुसखोरी केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 02 July 2026


सातारा : महिलेस धमकी देऊन त्यांच्या घरात अनाधिकाराने प्रवेश केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी दिनांक 30 रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तामजाईनगर परिसरात राहणार्‍या एका महिलेच्या घरात अनाधिकाराने घुसून त्यांना धमकी दिल्याप्रकरणी संतोष गणपतराव बोराटे, अनिकेत संतोष बोराटे, संकेत संतोष बोराटे तिन्ही (रा. करंजे पेठ, सातारा) आणि विजय महादेव पुजारी (रा. वाढे, ता. सातारा) व दादासाहेब रघुनाथ पाटील (रा. सदर बझार, सातारा) यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार इंगुळकर करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातार्‍यात दुकानदारांना बनावट पेमेंट स्क्रीनशॉट दाखवून सातारा शहरात सुमारे साडेपाच लाखांची फसवणूक
पुढील बातमी
सातारा शहरासह तालुक्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन युवती बेपत्ता

संबंधित बातम्या