सातारा तालुका पोलिसांकडून रिक्षा चोर जेरबंद

सातारा : सातारा तालुका पोलिसांनी चोरीस गेलेली रिक्षा ताब्यात घेऊन संशयिताला जेरबंद केले. प्रल्हाद शिवाजी माने (वय २५, रा. अजंठा चौक सातारा) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेंद्रे, ता. सातारा येथील अंकित आनंद वाघमारे यांनी रिक्षा (एमएच, ०५, डीक्यू, २५१८) चोरीस गेल्याची तक्रार तालुका पोलीस ठाण्यात दिली होती. या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, पोलीस उपअधीक्षक राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीलेश तांबे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला चोरट्याला अटक करण्याची सूचना केली होती. त्यानंतर पथकाने संशयितास वाढे, ता. सातारा येथून रिक्षासह ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान संबंधिताने रिक्षाची चोरी केल्याची कबुली दिली.

या कारवाईत सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे, हवालदार किरण निकम, रायसिंग घोरपडे, दादा स्वामी, शिखरे, प्रदीप मोहिते, अजित निकम, संदीप पांडव, शिवाजी डफळे आदींनी सहभाग घेतला.



मागील बातमी
परताव्याच्या अमिषाने महिलांची तब्बल साडेबावीस लाखांची फसवणूक
पुढील बातमी
मारहाण प्रकरणी सहाजणांवर गुन्हा

संबंधित बातम्या