सातारा : कास पुष्प पठार परीसरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३४ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारान्वये ३१ ऑक्टोंबरपर्यंत वाहतुकीत बदल केले आहेत.
साताऱ्याकडून कास पुष्प पठार व बामणोली बाजुकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतुक ही सातारावरुन कास पुष्प पठार कास धरण वरुन बामणोली कडे जाईल.
बामणोली व कास धरणाकडून सातारा बाजुकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतुक ही बामणोली कास धरण बाजुने घाटाई देवी मंदीर मार्ग घाटाई फाट्यावरुन साताराकडे जाईल.
घाटाई फाटा ते कास पुष्प पठार, कास धरण या मार्गावरुन कास धरणाकडे व बामणोली कडे जाण्यासाठी एकेरी वाहतुक राहील.