सातारा : देशातील पहिले मधाचे गाव म्हणून ओळखल्या जाणार्या मांघरमध्ये मधपोळ्याला मेन किडा, तर मधमाश्यांना अमेरिकन फ्राऊलब्रुड रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. त्यामुळे महाबळेश्वरसह जिल्ह्यातील मधपाळ संकटात आले आहेत. या रोगांमुळे मध उत्पादनात घट झाल्याने मधपाळ शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.
सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावर मधमाशापालनाला मोठा वाव आहे. राज्यातील नैसर्गिक विविधता पाहता सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर, वाई, पाटण, जावली तालुक्यात मधमाशीपालन व्यवसाय गत 70 वर्षांपासून सुरू आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या वर्षी खादी ग्रामोद्योग विभागाने देशातील पहिले मधाचे गाव देखील महाबळेश्वर तालुक्यातील मांघर येथे सुरू केले. मांघर गावातील एकूण लोकसंख्येच्या 90 टक्के लोक हे मधमाशी पालन करतात. त्यातून त्यांना कायमस्वरुपी रोजगार मिळाला आहे. मधातून चांगला आर्थिक नफाही मिळत असल्याने मधपाळ शेतकर्यांचे चांगले जीवनमान सुधारले आहे. मात्र सध्या ऋतुचक्र बदलले आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला. थंडीचे प्रमाणही वाढले आहे. दाट धुकेही मोठ्या प्रमाणात पडत आहे. ढगाळ वातावरणामुळे अधूनमधून अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत. या नैसर्गिक आपत्तीचा परिणाम मध उत्पादनावर झाला आहे. पावसाची उघडीप लवकर न झाल्याने जंगलातील फुलोर्याला त्याचा फटका बसला आहे.
त्यातच या परिसरातील मधमाशांना अमेरिकन फ्राऊलब्रुड रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. या रोगामुळे मधमाशा पोळ्यातच मृत्यूमूखी पडत आहेत. मधपोळ्यालाही मेनकिडाही लागला आहे. मधमाशांना फुलावर काम करता येत नाही. दर सात वर्षांनी कारवी वनस्पती फुलत असते. मात्र या वनस्पतीला फुले आल्यानंतरही पावसाने उघडीप घेतली नव्हती त्यामुळे मधाचे उत्पादनही घटले असल्याचे नानासाहेब जाधव यांनी सांगितले. याबाबत महाबळेश्वर येथील मधसंचालनालयाच्या अधिकार्यांशी संपर्क साधला असता मांघर येथे भेट देवून वसाहतीची पाहणी केली जाणार आहे. तसेच मधपाळ शेतकर्यांशी चर्चा केली जाणार असल्याचे सांगितले.
उत्तेकर नगर मध्ये 55 हजारांची घरफोडी |
शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
विलासपूर येथे सुमारे पावणे दोन लाखांची घरफोडी |
खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
लग्नाच्या आमिषाने युवतीवर अत्याचार |
रहदारीस अडथळा आणल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
आयेशा ताहेर मणेर हिचे सीए परीक्षेत यश |
सरपंच परिषदेचे रास्ता रोको नंतर धरणे आंदोलन |
डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी |
डॉ. बाबासाहेब आंबेडकरवादी संघटनांचा सातारा शहरात मोर्चा |
बांधकाम विभागाने कामाच्या दर्जाबाबत तडजोड करू नये |
संगममाहुली येथील राजघाटाचे पुर्ननिर्माण करणार : मंत्री शिवेंद्रसिंहराजे |
तोतया ‘आयपीएस’चा आणखी सोळा जणांना गंडा |
महाबळेश्वरसह जिल्ह्यातील मधपाळ संकटात |
देशातील ग्रामीण भागात नवीन बहुउददेशीय सहकारी संस्था उघडण्याचा निर्णय कौतुकास्पद |
रहदारीस अडथळा आणल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
आयेशा ताहेर मणेर हिचे सीए परीक्षेत यश |
सरपंच परिषदेचे रास्ता रोको नंतर धरणे आंदोलन |
डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी |
डॉ. बाबासाहेब आंबेडकरवादी संघटनांचा सातारा शहरात मोर्चा |
बांधकाम विभागाने कामाच्या दर्जाबाबत तडजोड करू नये |
संगममाहुली येथील राजघाटाचे पुर्ननिर्माण करणार : मंत्री शिवेंद्रसिंहराजे |
तोतया ‘आयपीएस’चा आणखी सोळा जणांना गंडा |
महाबळेश्वरसह जिल्ह्यातील मधपाळ संकटात |
देशातील ग्रामीण भागात नवीन बहुउददेशीय सहकारी संस्था उघडण्याचा निर्णय कौतुकास्पद |
रोटरी क्लबतर्फे ’राष्ट्र निर्माता’ पुरस्काराने शिक्षकांच्या गौरव |
शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार |
कोयना हेळवाक वनपरिक्षेत्रातील सर्व पर्यटनस्थळे 5 दिवस बंद |
मंत्री भरत गोगावले यांचा गड, किल्ला स्वच्छता मोहिमेस पाठिंबा |
युवती बेपत्ता |