सातारा : सातारा शहरासह तालुक्यातील दोन दुचाकींची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २५ ते २६ दरम्यान संस्कृत रणजीत नलावडे (रा. वाढे, ता. सातारा), यांची घरासमोर पार्क केलेली एनफिल्ड कंपनीची बुलेट (क्रमांक एमएच ११ बीएन ०५५०) अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याबाबतची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस नाईक वायदंडे करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत, दि. २१ रोजी सकाळी सव्वा नऊ ते सव्वादहा वाजण्याच्या सुमारास दादा दशरथ काळे (रा. कण्हेर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांची चार भिंती परिसरात असणाऱ्या पार्किंगमध्ये पार्क केलेली दुचाकी (क्रमांक एमएच ४५ पी १५३७) अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे अधिक तपास महिला पोलीस हवालदार पवार करीत आहेत.