कोरुगेटेड बॉक्स बनविण्याची मशिनरी न देता साडेअठ्ठावीस लाखांची फसवणूक; चौघांविरोधात गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 01 February 2026


सातारा : कोरुगेटेड बॉक्स बनविण्याची मशीन न देता २८ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

व्यावसायिक अभिजित हनुमंत शिंदे (वय ३२, रा. प्लॉट नं. ३ गणेश कॉलनी, संगमनगर, सातारा) यांनी फिर्याद दिली. हरिदास श्रीरंग चौरे (रा. उरळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे), कवलजितसिंग अमरजितसिंग वीरद्री, रजिंदर सिंग जसपालसिंग वीरदी व सनलाईट एक्स्पोर्ट आयएनसीचे मालक मनमित कौर, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. जून २५ पासून या चौघांनी विश्वास संपादन करून शिंदे यांच्याकडून रक्कम घेतली मात्र, मशीन न देता त्यांची फसवणूक केली. 



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खोलीतील पत्र्याच्या लोखंडी अँगलला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन संगम माहुलीत वृद्धाची आत्महत्या
पुढील बातमी
गटविकास अधिकारी असलेल्या पत्नीचा केल्याप्रकरणी सहायक सरकारी वकिलावर गुन्हा

संबंधित बातम्या