किडनी सक्षम, आरोग्य भक्कम

by Team Satara Today | published on : 21 September 2024


निरोगी मूत्रपिंडाचा आजार आयुष्याचा कार्यकाळ व वेग कमी करू शकतो. शरीराची संपूर्ण व्यवस्था कोलमडून पडू शकते. मूत्रपिंड खराब झाले तर हात आणि पाय यांना सूज येऊ शकते. रक्तदाबात वाढ होणे, हाडांमध्ये वेदना, अशक्तपणा, मळमळ, उलटी येणे आदी प्राथमिक लक्षणे आहेत.

ही लक्षणे अत्यंत धीम्या गतीने वृद्धिंगत होत राहातात. रोगी राहाण्यासाठी संपूर्ण शरीराची काळजी घेणे महत्त्वाचे आहेच. त्यातही शरीरातील किडनी किंवा मूत्रपिंडाचे आरोग्य चांगले राखणे गरजेचे आहे.

मूत्रपिंडाचा आजार आयुष्याचा कार्यकाळ व वेग कमी करू शकतो. रक्त शुद्ध करणे, हार्मोन्स निर्माण करणे, खनिजे शोषून घेणे, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकणे आणि आम्लाचे संतुलन राखणे आदी कार्य मूत्रपिंड करत असते. दुर्दैवाने काही कारणाने जर मूत्रपिंड रोगग्रस्त झाले तर शरीराची संपूर्ण व्यवस्था कोलमडून पडू शकते, त्यावर प्रभाव पडू शकतो.

लाल रक्तपेशींचे उत्पादन आणि हाडांसाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्त्वाचे चयापचय सर्वच बिघडते. दरवर्षी मूत्रपिंडाच्या विकारामुळे लाखो लोकांना जीव गमवावे लागतात. परंतु, योग्य वेळी योग्य उपचार झाल्यास रुग्णाचे प्राण वाचवता येतात.

मूत्रपिंडाच्या रोगांविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे. मूत्रपिंडाच्या विकारांच्या कारणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब आणि धमनीकाठिण्य यांचा समावेश असतो. या तीनही आजारांमध्ये मूत्रपिंडाच्या रक्तवाहिन्यांचे नुकसान होते.

वेदनाशामक गोळ्या किंवा प्रतिजैविके यांचेही दीर्घकाळ सेवन केल्यास मूत्रपिंडाचे नुकसान होते. मूतखडा किंवा प्रोस्टेट ग्रंथींची वाढ यामुळेही गुंतागुंत वाढू शकते. मूत्रपिंड खराब झाले तर हात आणि पाय यांना सूज येऊ शकते. रक्तदाबात वाढ होणे, हाडांमध्ये वेदना, अशक्तपणा, मळमळ, उलटी येणे आदी प्राथमिक लक्षणे आहेत.

ही लक्षणे अत्यंत धीम्या गतीने वृद्धिंगत होत राहातात. त्यामुळे रुग्णाला त्याविषयी काही समजत नाही. परिणामी योग्य वेळी उपचारही मिळत नाहीत. अनेकदा मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त रुग्णांच्या लघवीमधून प्रथिने आणि लाल रक्तपेशी जाऊ लागतात. त्याचबरोबर रक्तदाबही वाढतो. चेहरा आणि पाय यांना सूज येते.

त्वचेवर लाल चट्टे येऊ शकतात. सांधेदुखीचीही तक्रार जाणवू शकतो. मूत्रपिंड खराब झाल्यास काही लक्षणे मुख्यत्वे दिसून येतात. रक्तदाबात वाढणे, डोळे, हात, पाय यांना सूज येणे, लघवीमधून रक्त जाणे, लघवीचा रंग बदलतो, लघवीमध्ये जास्त फेस येणे, कमी किंवा सतत लघवी होणे,

रुग्णाची भूक कमी होते त्यामुळे व्यक्तीला खूप थकवा येतो. श्वासाला दुर्गंधी येते आणि तोंडाची चव गेल्याची तक्रारही रुग्ण करतात. मूत्रपिंडाची तपासणी करण्यासाठी किडनी फंक्शन टेस्ट केली जाते. मूत्रपिंड पूर्ण खराब झालेले असले तरीही डायलिसिस आणि मूत्रपिंड अश्वगंधामृत Baidyanath ASHWAGANDHAMBISH प्रत्यारोपणाच्या मदतीने रुणाला सामान्य आयुष्य जगणे शक्य होते. मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी उपयुक्त दात्याकडून मूत्रपिंड घेऊन रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपित केली जाते.

मूत्रपिंडाच्या आजारापासून बचाव : 

a)  रोज दीड ते दोन लीटर पाणी प्यावे. त्यामुळे शरीरातील सोडियम, युरिया आणि विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. मूत्रपिंडाला सूज आली असेल तर पातळ पदार्थांचे सेवन कमी प्रमाणात करावे.

b) आरोग्यदायी भोजन करावे. मूत्रपिंड अशक्त झाले असल्यास आहारात प्रथिनांचे प्रमाण कमी असावे. पनीर, डाळी, शेंगवर्गीय भाज्या, सोयाबीन आदी पदार्थ सेवन करू नयेत. मिठाचे प्रमाणही कमी असावे.

c) धूम्रपान आणि मद्यपान यांच्यापासून दूर रहावे. धूम्रपान केल्याने मूत्रपिंडातील रक्ताचा प्रवाह मंदावतो. अतिमद्यपान केल्याने शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मूत्रपिंडावर अधिक ताण येतो.

d) रक्तदाब नियंत्रणात असावा. उच्च रक्तदाबामुळे हृदयरोगांना आमंत्रण मिळतेच परंतु, त्यामुळे मूत्रपिंडाचे आजार होण्याचीही शक्यता असते.

e) शरीर तंदरुस्त ठेवण्याकडे लक्ष्य द्यावे. जीवनशैलीत सकारात्मक बदल करावेत. आठवड्यातून किमान पाच दिवस ३० मिनिटे व्यायाम अवश्य करावा.

f) वैद्यकीय सल्ल्याशिवाय कोणत्याही वेदनाशामक गोळ्या आणि प्रतिजैविकांचे सेवन करू नये,


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खंबाटकी घाटात अपघात मालट्रकने चार गाड्यांना उडविले
पुढील बातमी
शेवगा कोणत्याही सुपरफूडपेक्षा कमी नाही

संबंधित बातम्या