सातारा : सातारा तालुक्यातील पाटखळ येथे एका 51 वर्षीय व्यक्तीने राहत्या घराच्या मागील पत्र्याच्या शेडमधील लोखंडी अँगलला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 16 रोजी दुपारी महादेव मारुती लोंढे (वय 51, रा. पाटखळ, ता. जि. सातारा) यांनी राहत्या घराच्या मागील पत्र्याच्या शेडमधील लोखंडी अँगलला नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय, सातारा येथे दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. पोलीस हवालदार गोरे अधिक तपास करत आहेत.