सातारा : खरीप हंगाम सन २०२४-२०२५ मध्ये आधारभुत दरानुसार नाफेडमार्फत आधारभुत किंमत योजनेंतर्गत सोयाबीन खरेदी करणेकरीता खरीप हंगाम २०२४ मध्ये उत्पादीत सोयाबीन आधारभुत किंमत खरेदी योजनेअतंर्गत शेतक-यांकडुन ऑनलाईन नोंदणी करुन विक्री करणे करीता कोरेगांव तालुका खरेदी विक्री संघ लि. कोरेगांव मार्केट यार्ड कोरेगांव ता. कोरेगांव जि. सातारा (संपर्क-९९२२३९४८३३) या संघाकडे खरेदी केंद्र सुरु करण्यात आलेले आहे, अशी माहिती कोरेगाव सहकारी संस्था, सहायक निबंधक प्रिती काळे यांनी दिली.
ऑनलाईन नोंदणीकरीता शेतक-यांनी ७/१२ उतारा, खरीप हंगाम २०२४ मध्ये सोयाबीनची पिक पाणी नोंदीसह आधारकार्ड, बँक पासबुकच्या झेरॉक्स इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत शेतक-यांनी खरेदी केंद्रावर सोयाबीन माल घेऊन येताना तो स्वच्छ असावा. मालाची आद्रता कमाल १२ टक्के असावी. मालामध्ये काडी कचरा माती व डाळ नसावी. सदर बाबतीत मार्गदर्शक सुचना खरेदी केंद्रावर लावण्यात आलेल्या आहेत. सदरची नोंद सोयाबीन उत्पादक शेतक-यांनी घ्यावी.