कराडमध्ये बँक मॅनेजरने संपविले जीवन; दोन महिला क्षेत्रीय व उपक्षेत्रीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 15 November 2026


कराड : इंडियन बँक, कराड शाखेतील मॅनेजरने आगाशिवनगर-मलकापूर (ता. कराड) येथील राहत्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. या घटनेप्रकरणी पोलिसांकडून बँकेतील महिला उपक्षेत्रीय अधिकारी आणि क्षेत्रीय अधिकारी या दोघींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपक्षेत्रीय अधिकारी मैथेली शरण सावला व क्षेत्रीय अधिकारी अर्चना सहदेव अशी गुन्हा दाखल झालेल्या महिलांची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती व फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, रविकिरण केशव लाडे (मूळ रा. मुरुड, ता. जि. लातूर) यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत उपक्षेत्रीय अधिकारी मैथेली शरण सावला व क्षेत्रीय अधिकारी अर्चना सहदेव यांची नावे आहेत. त्यांच्या त्रासाला कंटाळून रविकिरण यांनी आत्महत्या केल्याचे चिठ्ठीत व फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी मृत रविकिरण यांचे बंधू अक्षय केशव लाडे (वय ३२) यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. संबंधित दोन्ही अधिका-यांनी रविकिरण यांना नेमका काय त्रास दिला होता, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. तपासकामी लाडे यांचा मोबाइल आणि बँकेतील काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहे. त्रास दिल्याचा आरोप असलेल्या दोन्ही महिला अधिका-यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नांदलापुरात अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्या जखमी; पुणे-बंगळुरू महामार्गावरील घटना, जखमी बिबट्याला शोधण्याची मोहीम सुरू
पुढील बातमी
पांगारीच्या १० वर्षीय श्रेयनने जिंकले कळसूबाईचे शिखर; लहान वयात मिळवलेल्या यशामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव

संबंधित बातम्या