अपघात प्रकरणी चारचाकी चालकावर गुन्हा

सातारा : अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी चार चाकी चालका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 6 रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तेजस्वी विकास पवार रा. चिंचणेर वंदन, ता. सातारा ही अल्पवयीन मुलगी रस्त्याच्या बाजूने पायी चालत जात असताना सुमंत बाबुराव पिसाळ रा. भांडुप, मुंबई. मूळ रा. विकास नगर, सातारा याने त्याच्या ताब्यातील किया कंपनीची कार क्र. एमएच 03 डीयु 7679 ने तिला पाठीमागून धडक दिली. या अपघातात ती जखमी झाली असून सुमंत पिसाळ या चालकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार वायदंडे करीत आहेत.


मागील बातमी
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
पुढील बातमी
अल्पवयीन मुलीचे अपहरण

संबंधित बातम्या