आपले सरकार सेवा केंद्रासाठी इच्छुकांनी 18 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

by Team Satara Today | published on : 11 August 2026


सातारा : राज्य शासनाने निर्धारीत केलेल्या निकषानुसार सातारा जिल्हयामध्ये 1 हजार 489 ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र वितरीत करणेत येणार आहेत.  आपले सरकार सेवा केंद्र नव्याने देणेसाठी कोणत्याही प्रकारची शासकीय फी स्वीकारली जात नसून संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे. आपले सरकार सेवा केंद्र चालविणेसाठी इच्छुक असलेल्या ग्रामपंचायत, नगरपंचायत व नगरपरिषद भौगोलिक क्षेत्रातील व्यक्तींनी, अटी शर्तीस अधीन राहून अर्ज अचूक व परिपूर्ण भरून ग्राम पंचायती व नागरी क्षेत्राच्या यादीतील नमूद असलेले गांव ज्या महसूली उपविभागाच्या कार्यक्षेत्रात आहे त्या उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये दिनांक 5 ते 18 ऑगस्ट 2026 या कालावधीत कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन महसूल प्रशासनाकडून करण्यात आले आहे.  

आपले सरकार सेवा केंद्र वितरीत करणेसाठीचा जाहिरनामा, आपले सरकार सेवा केंद्राची संख्या कमी असलेल्या ग्राम पंचायती व नागरी क्षेत्राची यादी, आपले सरकार सेवा केंद्र अर्ज मागविण्यासाठी अटी व शर्ती, आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्जाचा नमुना इ. बाबी सातारा जिल्हयाचे संकेतस्थळ https://www.satara.gov.in  वर उपलब्ध आहे. याबाबतचा जाहिरनामा दिनांक 4 ऑगस्ट रोजी प्रसिध्द करण्यात आला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुतळ्याचे १५ ऑगस्ट रोजी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते अनावरण; मान्यवरांची उपस्थिती

संबंधित बातम्या