आंबेनळी घाटात कार पलटी

by Team Satara Today | published on : 26 July 2025


प्रतापगड : महाबळेश्वर ते पोलादपूर दरम्यान असणार्‍या आंबेनळी घाटात दाट धुक्यात रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे पर्यटकाची कार साईडपट्टीच्या आली उतरल्याने पलटी झाली. सर्व पर्यटक महाबळेश्वर पर्यटनासाठी निघाले होते. 

अतिवृष्टीनंतर आंबेनळी घाटातील रस्ता चकाचक करण्यात आला. परंतु, रस्त्याला साईड पट्टा व रिप्लेक्टर नसल्यामुळे वाहन चालकाला रस्त्याच्या अंदाज येत नसल्याने अंबेनळी घाट दिवसा व रात्री धोक्याचा इशारा देत आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून महाबळेश्वर तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे रोजच धुक्याची दुलई पसरलेली असते. शुक्रवारी एका कारमधून पर्यटक महाबळेश्वरला निघाले होते. 

धुक्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने कार साईडपट्टीच्या आली उतरल्याने पलटी झाली. यामध्ये पर्यटक किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबवले. या अपघातानंतर महाबळेश्वरच्या महाडनाक्या पासून ते पोलादपूरपर्यंत रिप्लेक्टर बसवण्यात यावे, अशी मागणी होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
धर्मादाय रुग्णालयांमध्ये निर्धन व दुर्बल घटकांसाठी खाटा राखीव ठेवणे बंधनकारक
पुढील बातमी
पश्चिम घाट भाग आणि प्रमुख धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम

संबंधित बातम्या