विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा

by Team Satara Today | published on : 21 November 2026


सातारा : विविध कारणांवरून शारीरिक आणि मानसिक त्रास देत मारहाण केल्याच्या आरोपावरून कुमठे (ता. कोरेगाव) येथील एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रवीण लक्ष्मण जगदाळे, संगीता लक्ष्मण जगदाळे आणि लक्ष्मण शामराव जगदाळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अनुजा प्रवीण जगदाळे यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
तक्रारीनुसार, संबंधितांनी कुमठे तसेच पुणे येथे विविध कारणांवरून त्यांना त्रास दिला. केवळ मानसिक छळच नव्हे, तर शारीरिक मारहाणही केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार राऊत करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शनिवार पेठेतील गोरक्षण बोळ परिसरात घरफोडी; 42 हजारांचे मंगळसूत्र चोरीला
पुढील बातमी
दुचाकीचा कट मारल्याचा जाब विचारल्याच्या रागातून दोघांना मारहाण; तिघांविरोधात गुन्हा

संबंधित बातम्या