सातारा हिल हाफ मॅरेथॉनच्या पार्श्‍वभूमीवर रविवार दि. 6 सप्टेंबर रोजी सातारा शहरातील वाहतुकीत बदल

by Team Satara Today | published on : 03 September 2026


सातारा : सातारा शहरामध्ये रविवार दि. 6 सप्टेंबर रोजी पीबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन-2026 स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेवेळी वाहतुकीस कोणताही अडथळा येवू नये म्हणून पहाटे 5 वा. ते सकाळी 10 पर्यंत सातारा शहरातील वाहतुकीत खालीलप्रमाणे बदल करण्यात आले आहेत.
अ) वाहतुकीकरीता बंदी घालण्यात आलेले मार्ग : सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धा ही पोलीस परेड ग्राउंड येथुन सुरू होवून पोवई नाका -मरिआई कॉम्प्लेक्स -शाहु चौक - अदालत वाडा मार्गे - समर्थ मंदिर - बोगदा -यवतेश्वर-प्रकृती हेल्थ रिसॉर्टच्या पुढे 500 मीटर पासून वळून परत त्याच मार्गाने समर्थ मंदिर - अदालत वाडा - नगरपालिका -शाहू चौक-मरिआई कॉम्प्लेक्स -पोवई नाका मार्गे पोलीस परेड ग्राउंड येथे संपेल. त्यामुळे हा मार्ग रुग्णवाहिका, पोलीस वाहने, अग्निशमन दलाची वाहने वगळून सर्व वाहनांना स्पर्धा कालावधीमध्ये प्रवेश बंद राहील.
ब) वाहतुकीकरीता पर्यायी मार्ग : शिवराज पेट्रोल पंप, अंजठा चौक व गोडोली मार्गे सातारा शहरात येणारी सर्व वाहने ग्रेड सेपरेटर मार्गाने डी. बी. कदम मार्केट - राधिका सिग्नल येथून सातारा शहरात ये-जा करतील.
बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून सातारा शहरात येणारी सर्व वाहने जिल्हा परिषद चौक- कनिष्क हॉल चौक-रिमांड होम मार्गे -जुना आर.टी.ओ.चौक किंवा बांधकाम भवन -नवीन आरटीओ कार्यालय चौक- मुथा चौक - रिमांड होम मार्गे - जुना आर.टी.ओ.चौक- सुभाषचंद्र बोस चौक (भुविकास चौक) मार्गे सातारा शहरात ये-जा करतील.
मुख्य बसस्थानक - राधिका सिग्नल तहसिल कार्यालय मार्गे राष्ट्रीय महामार्ग कडे जाणारी सर्व वाहने ही ग्रेड सेपरेटर मार्गाने सातारा शहराच्या बाहेर जातील..
सज्जनगड, ठोसेघर, परळी कडून येणारी जाणारी सर्व वाहने ही शेंद्रे मार्गे खिंडवाडी रोडने शिवराज पेट्रोल पंप, अंजठा चौक व गोडोली मार्गे सातारा शहरात येणारी सर्व वाहने ग्रेड सेपरेटर मार्गाने डी. बी. कदम मार्केट-राधिका सिग्नल येथून सातारा शहरात ये-जा करतील.
कास बाजूकडून सातारा शहर बाजूकडे येणारी वाहने मॅरेथॉन स्पर्धा संपेपर्यंत प्रकृती हेल्थ रिसॉर्ट बाजु कडुन सातारा बाजूकडे येणार नाहीत . ती पर्यायी मार्गाने एकीव फाटा एकीव - मोळेश्वर -कुसुंबीमुरा -कुसुंबी मेढा मार्गे सातारा शहराकडे येतील.
पार्किंग : मॅरेथॉन स्पर्धेकरीता येणार्‍या स्पर्धकांनी व नागरीकांनी आपली वाहने ही प्रशासकीय इमारत व संग्रहालयाच्या मधील मोकळी जागा, जुनी भुविकास बँक येथील बेसमेंट पार्किंग, लँडमार्क टॉवर परिसर (चारही बाजुंनी), शाहु स्टेडीयम प्रवेशद्वावाराच्या उजव्या बाजुकडील पार्किंग ठिकाणी लावावीत.
या बदलाची सर्व नागरीकांनी नोंद घेवून पोलीस दलास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सदरबझारच्या लक्ष्मी टेकडीवर नक्की कोणाची दहशत? भयभीत नागरिकांचा शहर पोलीस ठाण्यावर मोर्चा; परिसरातील सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर
पुढील बातमी
त्या विद्यार्थिनीची आत्महत्या मानसिक तणावातून; वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हेत्रे यांची माहिती

संबंधित बातम्या