सैफवरील हल्ल्यामुळे प्रभासचा 'स्पिरीट' अन् ज्युनियर NTR च्या 'देवरा 2'वर परिणाम

7 चित्रपटांचं शुटिंग लांबणार

अभिनेता सैफ अली खानवर चोरट्याने जीवघेणा हल्ला केला, त्यानंतर तो गंभीर जखमी झाला. सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर, त्याच्या आगामी 7 चित्रपटांवर मोठा परिणाम होऊ शकतो. सैफ अली खान बॉलिवूड आणि साऊथच्या एकूण 7 चित्रपटांशी जोडलेला आहे, त्यामुळे त्याच्यावरील हल्ल्यानंतर या चित्रपटाच्या शेड्युलवर परिणाम होऊ शकतो. 

सैफ अली खानच्या आगामी सात चित्रपटांचे शेड्युल लाईनअप होतं, मात्र आता त्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार समोर आलेल्या माहितीनुसार, सैफ अली खान सध्या ज्वेल थीफ-द रेड सन चॅप्टरचे शूटिंग करत होता. याचं दिग्दर्शन शाहरुख खानच्या'पठाण' चित्रपटाचा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद करत आहे. हल्ल्यानंतर सिद्धार्थ आनंदही रुग्णालयात सैफला भेटायला आला होता.

गेल्या वर्षी रेस 4 चित्रपटाची चर्चा होती. निर्माता रमेश तौरानी यांच्या 'रेस' चित्रपटाच्या चौथ्या भागात सैफ अली खानच्या पुनरागमनाच्या बातम्या आल्या होत्या. रेस फ्रेंचायझीच्या पहिल्या दोन भागात सैफ अली खान होता आणि तिसऱ्या भागात सलमान खान दिसला होता. त्यानंतर सैफ रेस 4 मध्ये दिणार आहे. त्यामुळे सैफ अली खानला आगामी 'रेस 4' चित्रपटाचे चित्रीकरणही करायचं आहे. याशिवाय, सैफचे नाव प्रभासच्या स्पिरिट चित्रपटातही महत्त्वाची भूमिका साकारत आहे. 

याशिवाय सैफ अली खान दक्षिणेतील अभिनेता ज्युनियर एनटीआरसोबत 'देवरा पार्ट 2' चित्रपटातही दिसणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सैफने तमिळ दिग्दर्शक बालाजी मोहन यांच्या 'क्लिक शंकर' चित्रपटाची ऑफर देखील स्वीकारली आहे. दिग्दर्शक संजय गुप्ता यांच्यासोबत 'शूटआउट ॲट भायखळा' चित्रपटातही सैफ झळकणार आहे. या चित्रपटात सैफची मुलगी सारा अली खानही त्याच्यासोबत असेल, असं म्हटलं जात आहे. इतकंच नाही, तर प्रियदर्शनसोबतच्या त्याचा आणखी एक चित्रपट येणार आहे, या चित्रपटाचे नाव अद्याप जाहीर झालेलं नाही. 

मागील बातमी
प्रतापगड साखर कारखान्याकडू प्रतिटन ३ हजार रुपयांप्रमाणे ऊस बिल जमा
पुढील बातमी
'अजिंक्यतारा'चे कामकाज सहकारी कारखानदारीसाठी दिशादर्शक

संबंधित बातम्या