सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 18 रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास शेंद्रे येथे आदेश बाळकृष्ण सावंत रा. लोहारे, ता. वाई, जि. सातारा यांना मारहाण केल्याप्रकरणी गणेश पोतेकर ज्ञानदेव माने दोन्ही रा. शेंद्रे, ता. सातारा आणि राजू गोडसे रा. डोळेगाव, ता. सातारा यांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार निकम करीत आहेत.