सातारा : सातारा शहरांमध्ये लँडमार्क टॉवर येथे दि. २८ व २९ सप्टेंबर रोजी राजधानी जल्लोष दांडिया ग्रुपच्या वतीने राजधानी जल्लोष दांडिया स्पर्धा 2025 चे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेमध्ये विजेत्यांना रोख रकमेसह आकर्षक सरप्राईज गिफ्ट ही दिले जाणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने दिली आहे. स्पर्धा फक्त महिला व लहान मुलींसाठी असणार आहे.
सातारा शहरात नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी दांडिया आणि गरब्याचे आयोजन केले आहे. सातारा येथील राजधानी जल्लोष दांडिया या महिला समूहाने सातारा शहरातील लँडमार्क टॉवर येथे फक्त महिला व लहान मुलींसाठी दि. २८ व २९ सप्टेंबर रोजी सलग दोन दिवस दांडीया स्पर्धांचे आयोजन केले आहे.
या स्पर्धेमध्ये बेस्ट ग्रुप परफॉर्मन्स (किमान १० मेंबर आवश्यक) प्रथम क्रमांकासाठी ७००१, द्वितीय ५००१ व तृतीय क्रमांकासाठी ३००१ रुपये रोख व दोन उत्तेजनार्थ आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
तसेच बेस्ट ड्रेस –ट्रॅडिशनल, बेस्ट ड्रेपरी, बेस्ट स्माईल, बेस्ट कपल डान्स, युनिक डान्स स्टेप्स, किड्स गर्ल्स टू टेस्ट परफॉर्मन्स (८ ते १२ वर्षे) बेस्ट युथ परफॉर्मन्स (१३ ते १८ वर्षे) यासाठीही आकर्षक बक्षीस ठेवण्यात आले आहेत.
हा कार्यक्रम महिला व लहान मुलांचा असल्याने कार्यक्रम स्थळी सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक ठेवण्यात येणार आहेत. या ठिकाणी सेल्फी पॉईंट, सेलिब्रिटी मीट, ग्रूप फोटो क्लिक, लकी ड्रॉ आदी सुविधा उपलब्ध केले जाणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
कार्यक्रम स्थळी फूड, साडी व ज्वेलरी ज्वेलरी स्टॉल लावण्यासाठी इच्छुकांनी संपर्क करावा अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.
या स्पर्धेसाठी नाम मात्र ३०० रुपये प्रवेश शुल्क असणार आहे. लवकरात लवकर यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन, आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
– अधिक माहितीसाठी संपर्क : ९४२३०३६७६१, ७७२१९९५३५६, ८६०५८९७२५१, ८६०५८९७२५१