सातारा : खावली येथे एका भिकार्याचा मृतदेह आढळल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, खावली ता.सातारा येथे छपरामध्ये प्रमोद मधुकर साबळे (वय 65, रा. खावली) यांचा मृतदेह आढळला. सडलेल्या अवस्थेत दुर्गंधी सुटल्याने याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनेची नोंंद पोलीस ठाण्यात केली आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा