10:27pm | Sep 29, 2024 |
सातारा : जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्वत तर्फ वाघावळे येथील मल्लिकार्जून विद्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेमध्ये चिमुकल्यांनी कुंचल्याच्या माध्यमातून निसर्गचित्र रेखाटून आपल्या कलेचे दर्शन घडवले.
महाबळेश्वर तालुक्यातील अती दुर्गम भागात असलेल्या कांदाटी खोर्यातील पर्वत तर्फ वाघावळे येथील श्री मल्लिकार्जून विद्यालयामध्ये दि. 27 रोजी जागतिक पर्यटन दिनानिमित्ताने कांदाटी खोरे प्रकल्प कक्षातर्फे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून आपल्या कुंचल्यातून निसर्गाचे विविध अविष्कार साकारुन शिक्षकांसह कांदाटी खोरे प्रकल्प व्यवस्थापन कक्षातील अधिकार्यांनाही अचंबित केले.
कांदाटी खोर्यातील कांदाट, सालोशी, सातावीन पेढा, उचाट, वाघावळे, लामज, निवळी अशा दुर्गम भागातील मुलांमध्ये मोठी प्रतिभा पहायला मिळत असल्याने भविष्यामध्ये हीच मुले कलेच्या माध्यमातून शाळेचे आणि आपल्या भागाचे नाव निश्चितपणाने उज्ज्वल करतील, असे उद्गार श्री मल्लिकार्जून विद्यालयाचे मुख्याध्यापक निकम यांनी काढले.
जागतिक पर्यटन दिन निमित्ताने पर्यटनसंबंधी विषयांवर विविध चित्रे रेखाटून विद्यार्थ्यांनीही आपल्या कलेचा मनमुराद आनंद लुटला. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री मल्लिकार्जून विद्यालयाच्या शिक्षक वृदांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
या स्पर्धेवेळी उचाट च्या उपसरपंच मधुरा मोरे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांसह शिक्षक वृदांचेही कौतुक केले.
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने एकाचा मृत्यू |
जीवन प्राधिकरण कर्मचार्यांचे वेतन आयोगासाठी आंदोलन |
कॉंग्रेस पक्ष वाढीसह विधानसभेला हवे सुक्ष्म नियोजन |
वंचित आघाडीच्या वतीने 58 उमेदवारांच्या मुलाखती |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
झेडपीच्या आरोग्य विभागात 243 जणांना नियुक्ती |
उद्या शासकीय विश्रामगृहामध्ये होणार 'वंचित' च्या मुलाखती |
राजधानी रास दांडियाचे उदंड महिलांच्या प्रतिसादात उद्घाटन |
राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात |
खोटं बोलणार्या कॉंग्रेसला मतदारांनी हरवलं : विकास गोसावी |