सातारा : विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी चार जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 फेब्रुवारी 2024 ते 4 जून 2025 दरम्यान प्रगती राहुल तुपे रा. आसू, ता. फलटण, जि. सातारा या विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पती राहुल अशोक तुपे, सासू छाया अशोक तुपे, सासरे अशोक नारायण तुपे, दीर रोहित अशोक तुपे सर्व रा. आसू, ता. फलटण, जि. सातारा यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार गुरव करीत आहेत.