मारहाण प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा

सातारा : एकास विनाकारण मारहाण केल्याप्रकरणी दोन अज्ञातांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 17 रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान राजेंद्र शंकर सिंग परदेशी रा. सदर बाजार, सातारा हे खंडोबाचा माळ येथील खंडोबाच्या मंदिराकडे जात असताना दोन अज्ञातांनी दुचाकीवरून येऊन दारूच्या नशेत विनाकारण त्यांना लाकडी दांडक्याने तसेच हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अधिक तपास महिला पोलीस हवालदार सावंत करीत आहेत.


मागील बातमी
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
पुढील बातमी
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा

संबंधित बातम्या