खंडाळ्याजवळ दोन अपघातात दोघे ठार

by Team Satara Today | published on : 17 June 2025


शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडी व शिरवळ याठिकाणी झालेल्या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शिरवळ येथे झालेल्या अपघातामध्ये टेम्पोचालक रामदास भोलाजी ढगे (वय 67, रा. उल्हासनगर जि.ठाणे) यांचा तर शिंदेवाडी याठिकाणी झालेल्या अपघातामध्ये सुनील आनंदा यादव (वय 42,रा.केर पो.बोन्द्री ता.पाटण) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनांची नोंद शिरवळ पोलिस ठाण्यात झाली आहे. 

इचलकरंजी, जि.कोल्हापूर येथील येथील एका ट्रान्सपोर्ट कंपनीमधून कापड माल भरून टेम्पो (क्रं.एमएच-43-बीजी-3841) मधून रामदास ढगे हे खालापूर, मुंबई याठिकाणी घेऊन निघाले होते. यावेळी टेम्पो शिरवळ ता. खंडाळा गावच्या हद्दीत आला असता महामार्गावरील एका पेट्रोलपंपासमोर भरधाव वेगाने आलेल्या दुसर्‍या टेम्पोन ढगे यांच्या टेम्पोला जोरदार धडक दिली. यामध्ये केबिनचा चक्काचूर झाला.

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शिरवळ पोलीस, शिरवळ रेस्क्यू टीम व सारोळा महामार्ग मदत केंद्राच्या पोलिसांनी धाव घेतली. यानंतर गंभीर जखमी झालेल्या ढगे यांना केबिनबाहेर काढून खासगी रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी शाम ढगे यांनी फिर्याद दिली. शिंदेवाडी ता. खंडाळा येथील एका हॉटेलसमोर असणार्‍या उड्डाणपुलाच्या उताराला पुणे बाजूकडे चालत जाणार्‍या सुनील यादव यांना अज्ञत वाहनाने धडक दिली. अपघातानंतर स्थानिकांनी त्यांना शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, त्यांचा त्यापूर्वीच मृत्यू झाला. या अपघातातील चालकाने पलायन केले. याप्रकरणी जितेंद्र यादव यांनी फिर्याद दिली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महाराष्ट्र पर्यटन दृष्टी 2047
पुढील बातमी
शेंदुरजणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी विविध क्षेत्रात नावलौकीक मिळवतील

संबंधित बातम्या