नगरपालिकांच्या निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार; सातारा येथे घटक पक्षांच्या बैठकीत निर्णय

by Team Satara Today | published on : 06 November 2025


सातारा : जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढविण्याचा निर्णय गुरुवारी आघाडीच्या घटक पक्षांच्या बैठकीत घेण्यात आला.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख, राजेंद्र शेलार, बाबासाहेब कदम, रजनी पवार, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस नरेश देसाई, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, डॉ. नितीन सावंत, राजाभाऊ निकम, पारिजात दळवी, गोरख नलवडे, किसनशेठ भिलारे, साहिल शिंदे, विजय बोबडे, संतोष शिंदे, विजय बोबडे, शिवसेना ठाकरे गटाचे नरेंद्र पाटील, हणमंत चवरे, यशवंत घाडगे, बाळासाहेब शिंदे, सुमित नाईक, गणेश अहिवळे, प्रणव सावंत, मनसेचे राहुल पवार, शहर सुधार समितीचे अस्लम तडसरकर, विजय निकम, शंकर पाटील उपस्थित होते.

जिल्ह्यातील नऊ पालिका व एका नगरपंचायतीची निवडणूक सर्व महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी एकत्र लढवण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. या निवडणुका आमदार शशिकांत शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात येणार आहेत. सत्ताधारी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार पक्षांचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीतील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र काम करावे, असे आवाहन आ शशिकांत शिंदे यांनी केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जमिनीच्या मोबदल्यासाठी बिजवडीत दि.7 रोजी रास्ता रोको आंदोलन ; माण व फलटण तालुक्यातील शेतकरी उतरणार रस्त्यावर
पुढील बातमी
सातार्‍यात आजपासून ग्रंथदिंडीने ग्रंथ महोत्सवाचा प्रारंभ; जिल्हा परिषद मैदानावर साहित्यिक कार्यक्रमांची रेलचेल

संबंधित बातम्या