सातारा : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघाचे मतदार नोंदणी अनुषंगाने दि. १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या मतदार यादया नव्याने तयार करणेबाबतचा कार्यक्रम विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे तथा मतदार नोंदणी अधिकारी शिक्षक व पदवीधर मतदार संघ यांचेमार्फत दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आला आहे.
त्याअंतर्गत जिल्हाधिकारी सातारा व २६२ सातारा विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांत अधिकारी सातारा हे सहा मतदार नोंदणी अधिकारी आहेत. त्यांचे देखरेखीखाली सातारा तालुक्यासाठी खालील ६ पदनिर्देशित अधिकारी यांचेमार्फत दि. ६ नोव्हेंबर २०२५ पर्यंत प्राप्त अर्जाचे छाननी करण्यात येवून सातारा तालुक्यातील पुणे विभाग पदवीधर मतदार संघाचे भाग क्र ३०५ ते ३२९ तसेच शिक्षक मतदार संघाची यादी भाग क्र. २११ ते २१७ ची प्रारूप मतदार यादी दि. ०३ डिसेंबर २०२५ रोजी तहसिलदार सातारा व उपविभागीय अधिकारी सातारा, मुख्याधिकारी सातारा नगरपरिषद, व गटविकास अधिकारी पंचायत समिती सातारा यांचे नोटीस बोर्डावर, व सर्व संबंधित मतदान केंद्रावर आज रोजी रितसर प्रसिध्द करणेत आलेली आहे.
प्रस्तुत प्रसिध्द केलेली प्रारूप मतदार यादीची पाहणी करून संबंधित मतदाराने आपल्या नावाची खात्री करावी व याउपरही नावामध्ये हरकत दुरूस्ती अथवा नव्याने नोंदणी करावयाची असल्यास विहीत नमुन्यातील फॉर्म नं अनुक्रमे फॉर्म नं ७,८ व १८,१९ भरून संबंधित पदनिर्देशित अधिकारी अथवा निवडणुक शाखा तहसिल कार्यालय सातारा येथे दि. १८ डिसेंबर २०२५ पर्यंत हरकती व दावे स्विकारण्यात येतील याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आशिष बारकुल व पदनिर्देशित अधिकारी तथा तहसिलदारसमीर यादव यांनी केले आहे.