सातारा : राजवाडा ते स्टेट बँक ऑफ इंडिया मार्गावरील आळूचा खड्डा परिसरातील मोकळ्या जागेत टपरीच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत 2 हजार 280 रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.
वैभव सुभाष गायकवाड (वय 27, मूळ रा. पिंपळगाव बसवंत, ता. निफाड, जि. नाशिक; सध्या रा. कोंडवे, ता. सातारा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस हवालदार सनी आवटे यांनी ही कारवाई केली.