सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी

सातारा : सातारा शहरातून दोन दुचाकी चोरीस गेल्याच्या फिर्यादी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 रोजी रात्री आठ ते सव्वा आठ वाजण्याच्या दरम्यान सिव्हिल हॉस्पिटल साताराच्या पार्किंग मधून संदीप साहेबराव आवाडे रा. सैदापूर, सातारा यांची दुचाकी क्र. एमएच 11 सीआर 6766 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार देशमुख करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत, दि. 16 रोजी संध्याकाळी 7 ते 8 वाजण्याच्या दरम्यान कस्तुरी हॉटेल बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून अक्षय शहाजी शिरकांडे रा. शाहूनगर, सातारा यांची दुचाकी क्र. एमएच 11 एव्ही 5551 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.



मागील बातमी
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई
पुढील बातमी
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी

संबंधित बातम्या