सातारा : सध्या पावसाचे दिवस सुरु आहेत. या पावसात गरिब, गरजू, निराधारांना पावसात भिजण्याची वेळ येते. त्यांची ही समस्या लक्षात घेवून राजकीय हेतू बाजूला ठेवत सामाजिक बांधिलकेचा विचार करत सातारचे माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे मित्र परिवाराच्यावतीने आज छत्री वाटपाचा निर्णय घेतला. तो उपक्रम स्तुत्य असल्याचे खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले यांनी सांगितले.
कास तलावाच्या ओटी भरणाचा कार्यक्रम खासदार श्रीमंत छ. उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पार पाडला. या कार्यक्रमानंतर औपचारीकरित्या या छत्र्यांचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, माजी नगराध्यक्ष रंजना रावत, सुजाता राजेमहाडिक, शिवानी कळसकर, माजी सभापती अनिता घोरपडे, माजी नगरसेवक वसंत लेवे, राम हादगे, राजू भोसले, सागर पावशे, पंकज चव्हाण, खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक व प्रतापगड प्राधिकरण समितीचे सदस्य काका धुमाळ, पाणी पुरवठा विभागाचे अभियंता शहाजी वाठारे, संदीप सावंत आदी उपस्थित होते.
खा. उदयनराजे भोसले म्हणाले, सातारा शहरातील गोर-गरीब, गरजू लोकांसाठी माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे मित्र परिवाराच्यावतीने अडीच हजार छत्र्यांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. ही बाब प्रेरणादायी आहे. मनोज शेंडे मित्र समुहाच्या माध्यमातून गरजू लोकांना दिलेल्या छत्रीची किंमत पैशात मोजता येणार नाही. त्यामागे त्यांची तळमळ व भावना ही लाख मोलाची दिसून येत आहे. त्यांनी गरीबांप्रती दाखवलेले प्रेम व जिव्हाळा निश्चितच इतरांना प्रेरणादायी ठरला आहे.
आभार सातारचे माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी मानले.