दलित महासंघाची गाव तिथे शाखा व घर तिथे कार्यकर्ता संकल्पना राबवणार - उमेश चव्हाण; दलित महासंघाच्या राज्य उपाध्यक्षपदी सूर्यकांत काळे यांची निवड

by Team Satara Today | published on : 06 October 2026


सातारा : महाराष्ट्र राज्य दलित महासंघ ही संघटना सर्व जातीधर्मातील वंचित घटकांसाठी काम करणारी संघटना आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराने काम करत असताना सूर्यकांत काळे यांची राज्य उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांच्या निवडीमुळे संघटनेला मोठी ताकद मिळाली असून आता राज्यभर गाव तिथे शाखा व घर तिथे कार्यकर्ता ही संकल्पना राबवून संघटनेची ताकद वाढवणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य दलित महासंघाचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केले.
दलित महासंघाच्या बैठकीत संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी ज्येष्ठ व धडाडीचे नेते सूर्यकांत काळे यांची निवड करण्यात आली. यावेळी उमेश चव्हाण बोलत होते. यावेळी संदीपभाऊ माने सुभाष गुंजाळ सविता कणसे, गुरमितसिंग लोहिया, विमल शिंदे, आशिकी गुंजाळ, रीना भोसले, अर्पिता पवार तसेच विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सूर्यकांत काळे यांना उमेश चव्हाण यांच्या हस्ते निवडीचे पत्र देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.
उमेश चव्हाण म्हणाले, सध्याच्या सामाजिक स्थितीत सर्व स्तरातील नागरिकांना निर्भयपणे जगता येण्यासाठी सरकारने काम करणे गरजेचे आहे. मात्र, वाढती गुन्हेगारी, वाढती बेरोजगारी, वाढती महागाई यामुळे समाजमन त्रस्त आहे. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी दलित महासंघाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यामुळे जनतेचा पाठिंबा हीच आमची मोठी ताकद असून यापुढे संघटना अधिक जोमाने काम करत राहील.
निवडीनंतर बोलता सूर्यकांत काळे म्हणाले, दलित  महासंघाच्या माध्यमातून संघटना वाढीसाठी विविध उपक्रम राबवण्याबरोबरच संघटनेला नवचैतन्य देण्याचे काम करण्याचा संकल्प आम्ही उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली केला आहे. दलित महासंघातून दूर झालेले कार्यकर्ते पुन्हा संघटनेत सहभागी होत असून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलन छेडण्यात येणार आहे. सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताकद देण्यात आम्ही पडणार नाही. जुन्या नवीन कार्यकर्त्यांना पुन्हा दलित महासंघामध्ये मानाचे स्थान देऊन मातंग समाज व इतर बहुजन समाजामध्ये पुन्हा दलित महासंघाचा विचार रुजवणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेचा लाभ घ्यावा; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांचे आवाहन

संबंधित बातम्या