सातारा : अज्ञात चोरट्याने घराच्या अंगणातून मोबाईलची चोरी केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मोळाचा ओढा येथील नंदन रेसिडेन्सीमधील एका घराच्या अंगणातून मोबाईलची चोरी झाली. याप्रकरणी सुधीर मोहन जाधव (रा. करंजे तर्फ मोळाचा ओढा सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, अज्ञात चोरट्याच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार दि. 21 एप्रिल रोजी सायंकाळी पाच ते साडेसात वाजण्याच्या दरम्यान घडला. पोलीस नाईक साबळे तपास करत आहेत.