सातारा : पोवई नाक्यावरील जुन्या डीसीसी बँकेसमोरील ग्रेड सेपरेटरच्या डक्टमध्ये एकजण वरुन पडल्याने जखमी झाला. जखमीला सिव्हीलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात बघ्यांची गर्दी उसळत हल्लकल्लाेळ उडाला.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, जखमी व्यक्ती सातार्यातील मनोरुग्ण आहे. बुधवारी सकाळी तो उन्हाला बसला होता. त्या तंद्रीत तो वरुन ग्रेड सेपरेटरच्या डक्टमधून खाली पडला. उंचावरुन पडल्याने मनोरुग्ण व्यक्तीला दुखापत झाली व तो मदतीसाठी ओरडू लागला. ही घटना पाहिल्यानंतर व आवाजाने परिसरातील नागरिक तेथे जमा झाले.
या घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या सहकार्याने त्याची सुटका करण्यात आली. जखमी झाल्याने त्याला साता जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तोपर्यंत पोवई नाका परिसरात बघ्यांची गर्दी उसळली.