सातारा : उसने पैसे घेतलेल्या कारणावरून मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 20 रोजी आशुतोष विनायक लोहार (रा. विकास नगर, सातारा) याचा लहान भाऊ तेजस याने उसने पैसे घेतल्याच्या कारणावरून तेथीलच अक्षय दिलीप सोनटक्के याने चाकूने लोहार यास मारहाण केली. तसेच त्याची आई सोडवण्यासाठी आली असता आईलाही मारहाण करून धमकी दिली. याप्रकरणी सोनटक्के याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार कणसे करीत आहेत.
उसने पैसे घेतल्याच्या कारणावरून मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 23 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा