सातारा : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजनेअंतर्गत कर्ज प्रकरण दाखल केलेल्या अर्जदारांची निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती सदस्यांच्या उपस्थितीत एकूण १३८ अर्जदारांपैकी सन २०२४-२५ मधील उद्दिष्टानुसार महिला १५ व पुरुष १५ असे एकूण ३० कर्ज प्रकरणांची सोडतीद्वारे चिड्डी काढून निवड करण्यात आली आहे. २०२५-२६ मधील उद्दिष्टानुसार २५ महिला व २५ पुरुष असे एकूण ५० कर्ज प्रकरणांची निवड करण्यात आली असल्याची माहिती महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सुशांत घनवट यांनी दिली.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील गरजू घटकांचा आर्थिक उन्नतीसाठी, तसेच त्यांना स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने, रक्कम रु.एक लाख पर्यंत रक्कमेची थेट कर्ज योजना राबविण्याबाबत शासनाने मान्यता दिलेली दिली असून, सातारा जिल्ह्याकरिता सन २०२४-२५ करिता ३० व २०२५-२६ करिता ५० कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजनेंतर्गत ८० लाभार्थ्यांची निवड
by Team Satara Today | published on : 27 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा