सातारा : महाराष्ट्रात विविध पदावर कामकाज केलेले संतोष पाटील यांची सातारा जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाली त्याबद्दल सिनिअर अग्रीकॉस मित्र मंडळीनी संतोष पाटील यांचे स्वागत व सत्काराचा कार्यक्रम सातारा क्लब येथे आयोजित केला होता. संतोष पाटील यांचा सत्कार कुपर कार्पोरेशन प्रा. लि., चे चेअरमन फारुख कुपर आणि सातारा जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांचे शुभ हस्ते करणेत आला. याप्रसंगी निवृत्त अतिरिक्त आयुक्त तानाजीराव शिंदे, अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवींद्र आवळे, मुद्रांक जिल्हाधिकारी संजय पाटील, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र चौधरी, जिल्हा कृषी अधीक्षक सौ. भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख संत निकम तसेच विविध विभागातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस अधिकारी, जिल्हा परिषद अधिकारी, जीएसटी अधिकारी व मान्यवर उपस्थितीत होते.
सत्काराबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना संजय पाटील यांनी यशवंतराव चव्हाण यांचेसारखे दिग्गज आणि क्रांतीविरांचा जिल्हा असलेल्या सातारा जिल्ह्यात प्रशासकीय सेवेची संधी मिळालेबद्दल आनंद व्यक्त केला. महसूल सेवेबरोबरच सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे आणि प्रशासनातील सर्व खाते प्रमुख यांना सोबत घेऊन जिल्हा विकासाचे रोल मॉडेल बनवू असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. फारुख कुपर यांच्याकडून वयाच्या ऐंशीव्या वर्षी सुद्धा काम करण्याचा उत्साह आणि नवनिर्मितीच्या संकल्पना या खूपच प्रेरणादायी असलेचे गौर्वोदगार यावेळी त्यांनी काढले. अल्पावधीतच सातारा जिल्हा बँकेची माहिती घेऊन त्यांनी बँकेचे विशेष कौतुक केले. यावेळी पाटील यांनी त्यांचे कॉलेज जीवनातील विविध अनुभव कथित केले आणि सर्व अग्रीकॉस मित्र मंडळी प्रशासकीय अधिकारी यांनी सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेबद्दल आभार व्यक्त केले.
या प्रसंगी फारुख कुपर यांनी कृषी पदवी घेऊन तसेच उद्योजकीय वारसा मिळालेने पहिल्यापासून जिज्ञासापूर्वक आणि मेहनतीने कामकाज केलेने उद्योजकीय जीवनात यशस्वी झालेचे सांगितले. याबरोबरच त्यांनी आधुनिक शेती सुद्धा केलेली असून शेतीतील विविध अनुभव यावेळी त्यांनी कथित केले. संतोष पाटील यांनी प्रशासनाच्या माध्यमातून जिल्ह्यात महसूल तसेच शेतीशी निगडीत चांगले कामकाज करून नावलौकिक वाढवावा अशी अशा व्यक्त करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, संतोष पाटील कार्यक्षम व मितभाषी अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे ते पदवीधर आहेत. शेती पदवी संपन्न अधिकारी या जिल्ह्याला मिळाला असलेने जिल्ह्यातील शेती विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार असलेच्या भावना व्यक्त केल्या. जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तसेच पिंपरी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. बँकेच्या गत सात दशकातील बँकेची यशस्वी वाटचालीची माहिती देऊन बँकेमार्फत जिल्ह्यातील सामान्य शेतकऱ्याच्या विकासासाठी राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती दिलेने संतोष पाटील प्रभावित झाले. यावेळी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी सर्वांचे वतीने संतोष पाटील यांचे अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तहसीलदार नागेश गायकवाड यांनी प्रास्ताविकामध्ये संतोष पाटील यांनी उपजिल्हाधिकारी म्हणून केलेल्या उल्लेखनीय कामकाजाची माहिती दिली. कृषी अधिकारी यांनी वेळोवेळी शेतकऱ्यांच्या बांधावर जावे तसेच विविध अनुषंगाने शेतकरी मेळावे घ्यावे अशी अशा व्यक्त करून संतोष पाटील यांचे अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र चौधरी, जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संतोष पाटील यांनी यापूवी विविध पदांवर केलेल्या उल्लेखनीय कामकाजाची प्रशंसा करून संतोष पाटील यांचे जिल्हाधिकारीपदी निवड झालेबद्दल अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अग्रीकॉस ग्रुपचे समन्वयक बंटीराजे जगताप यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी होणेसाठी गणेश नलावडे, सुभाष बनसोडे भरत देशमुख, संताजी यादव, तुषार साबळे, किरण जाधव आदींनी परिश्रम घेतले.