शाहरुखच्या मन्नत बंगल्यातही अज्ञाताकडून घुसखोरीचा प्रयत्न

सैफवर हल्ला करणारा हाच 'तो', पोलिसांचा संशय

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून चाकूहल्ला करण्यात आल्याने देशभरात खळबळ उडाली असताना, बॉलिवूड इंडस्ट्रीसह राज्याच्या कायदा सुव्यवस्थेबाबत एक गंभीर बाब समोर आली आहे. अभिनेता  सैफ अली खानवरील हल्ल्याचे प्रकरण ताजे असतानाच अभिनेता शाहरुख खानच्या घरात अशाच पद्धतीने घुसण्याचा एकाने प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. 2-3  दिवसांपूर्वी शाहरुखच्या मुंबईतील मन्नत बंगल्यात घुसखोरी  करण्याचा एका अज्ञात इसमाने प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र भिंतीवर चढून देखील मध्ये जाळी आल्याने बंगल्यात घुसण्यात हा व्यक्ति अपयशी ठरल्याचेही सांगितलं जातंय.

मन्नत बंगल्यातील कुंपन भिंतीवर असलेल्या जाळीमुळे शाहरुखच्या घरात घुसण्याचा हा प्रयत्न अपयशी ठरला आहे. मात्र घरात घुसखोरी करण्यामागील या व्यक्तिचे नेमका उद्देश आणि कारण काय? हे अद्याप अस्पष्ट आहे. दुसरीकडे सैफ अली खानवर हल्ला करणारा आणि शाहरुखच्या घरात घुसखोरी करणारा व्यक्ति एकच असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. मात्र या प्रकरामुळे सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेबाबत अनेक प्रश्न आता विचारले जात आहे.    

मागील बातमी
‘त्या’ लाडक्या बहिणींना जानेवारीचे पैसे भेटणार नाहीत
पुढील बातमी
भारतीय महिला संघ बांगलादेशविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत खेळणार

संबंधित बातम्या