सातार्‍यात स्वातंत्र्यदिनी ‘मिसाल वतनसे मोहब्बत की’ पुरस्कार सोहळा

by Team Satara Today | published on : 14 August 2025


सातारा : भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. अनेकांनी बलिदान दिले. स्वातंत्र्यलढ्यात अनेक क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, ज्ञात-अज्ञात देशवासियांनी प्राणांची आहुती दिली. या शूरविरांच्या स्मरणार्थ स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून दि. 15 ऑगस्ट रोजी ‘मिसाल वतनसे मोहब्बत की’ पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजता ईदगाह मैदान गेंडामाळ कब्रस्तान सातारा येथे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ट्रस्टच्यावतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.

अ‍ॅड. चंद्रकांत बेबले, राजू गोरे, पैलवान साहेबराव पवार, पत्रकार विजय मांडके, विनित पाटील, कन्हैय्याला राजपुरोहित, सचिन शेळके, यशवंतराव गायकवाड, सुनील राठी यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी सातारकरांनी उपस्थित राहून स्वातंत्र्यसैनिकांच्या देशप्रेमाचा इतिहास समजून घ्यावा, असे आवाहन जमिअत उलमा ए हिंद व गेंडामाळ कब्रस्तान ट्रस्टच्यावतीने मौलाना जमीर, सादिकभाई शेख, मुफ्ती उबेदुल्लाह, आतार, मुफ्ती मोहसिन बागवान, मोडंमद शेख, खलील तांबोळी, मुबीन बागवान, आरिफ खान, अझहर मणेर आदींनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता
पुढील बातमी
चीनमधील मुलींना 'साताऱ्याची गुलछडी’ गाण्याची भुरळ

संबंधित बातम्या