सातारा : रुग्णसेवेबाबत लायन्स क्लब चे योगदान कौतुकास्पद आहे. लायन्स क्लब सातारा ने विविध उपक्रमांमधून समाजाप्रती जी बांधिलकी जपली आहे, ती नेहमीच इतरांना प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी केले.
सातारा जिल्हा रुग्णालयात जिल्हाभरातून रुग्ण येत असतात. तसेच त्यांच्याबरोबर त्यांचे नातेवाईकही असतात. त्यांची पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता 15 ऑगस्ट या भारताच्या स्वातंत्र्यदिनी लायन्स क्लब ऑफ सातारा जनसेवा यांच्यावतीने सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येणार्या रुग्णांसाठी व त्यांच्या नातेवाईकांसाठी तसेच हॉस्पिटलमधील कर्मचारी, मेडिकल कॉलेजचे स्टुडन्ट तसेच स्टाफ साठी पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय व्हावी म्हणून जिल्हा रुग्णालयाच्या आवारामध्ये वॉटर एटीएम मशीन बसविण्यात आली. जेणेकरुन सगळ्यांना याचा नाममात्र शुल्कात लाभ घेता येईल. या वॉटर एटीएम मशीनच्या लोकार्पण प्रसंगी सातारा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर युवराज करपे, तसेच डॉक्टर मेजर राहुलदेव खाडे व सिव्हिल हॉस्पिटल चे सर्व डॉक्टर्स, त्याचबरोबर लायन्स क्लब ऑफ सातारा जनसेवा च्या अध्यक्षा डॉक्टर कामिनी पाटील, पीडीजी लायन प्रभाकर आंबेकर, लायन प्रशांत साळुंखे, फार्मसी स्टेट कौन्सिल चे संचालक लायन प्रवीण पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य उपाध्यक्ष सागर भोगांवकर, लायन चंद्रजीत पाटील, लायन अमितराज शेटे, खजिनदार लायन सावळाराम गहलोत, लायन चौधरी, लायन मनीष आंबेकर, लायन रमेश ओसवाल, लायन उत्तमसिंग देवल, लायन हिंदुराव शिंदे, लायन मंगलसिंग पुरोहित, लायन मोहन पुरोहित आदी मान्यवर उपस्थित होते.
लायन्स क्लब ऑफ सातारा जनसेवा यांनी केलेल्या या सामाजिक कार्याबद्दल रुग्णालयातील रुग्ण, त्यांचे नातेवाईक, विविध विभागांचे डॉक्टर्स, सिस्टर्स तसेच संपूर्ण स्टाफने लायन्स क्लबचे आभार मानले आहेत. लायन्स क्लबच्या माध्यमातून डायलिसिस सेंटर चालवले जातात. यामध्ये रुग्णांना मोफत डायलिसिस रुग्णसेवा उपलब्ध करून दिली जाते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व लायन्स क्लबच्या कार्याचा आढावा लायन प्रशांत साळुंखे यांनी दिला.
रुग्णसेवेबाबत लायन्स क्लब चे योगदान कौतुकास्पद : डॉ. युवराज करपे
स्वातंत्र्य दिनी जिल्हा रुग्णालय परिसरातील वॉटर एटीएम मशीनचे लोकार्पण उत्साहात
by Team Satara Today | published on : 16 August 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा