उरमोडी धरण जलाशयाचे ‌‘छत्रपती अभयसिंहराजे भोसले जलाशय‌’ असे नामकरण करण्याचा राज्य शासनाचा निर्णय

by Team Satara Today | published on : 09 April 2026


सातारा : जिल्ह्यातील सातारा, खटाव व माण तालुक्यातील सिंचन व्यवस्थेला उरमोडी धरणाने भक्कम आधार दिला आहे. जिल्ह्यातील मोठा प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उरमोडी धरण जलाशयाचे ‌‘छत्रपती अभयसिंहराजे भोसले जलाशय‌’ असे नामकरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने बुधवारी घेतला.

उरमोडी धरणामुळे जिल्ह्याच्या कृषी क्षेत्राला मोठा फायदा झाला आहे. विशेषत: पावसावर अवलंबून असलेल्या माण, खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांना या धरणामुळे दिलासा मिळाला आहे. या धरणाच्या जलाशयाला ऐतिहासिक व स्थानिक महत्त्व असलेल्या व्यक्तिमत्त्वाचे नावे देण्याची मागणी बऱ्याच वर्षांपासून शासनाकडे होत होती. उरमोडी धरण जलाशयाला ‌‘छत्रपती अभयसिंहराजे भोसले जलाशय‌’ असे नाव दिल्याने स्थानिक पातळीवर ऐतिहासिक परंपरेचा गौरव होणार असल्याची भावना जनतेतून व्यक्त होत आहे.

उरमोडी धरणाच्या उभारणीत स्व. अभयसिंहराजे भोसले यांचा मोलाचा वाटा आहे. सातारा, खटाव व माण तालुक्यातील कोरडवाहू शेतीला भक्कम आधार मिळाला आहे. दुष्काळी परिस्थितीतही शेतकऱ्यांना स्थैर्य देणारा जलस्रोत म्हणून उरमोडी धरण महत्त्वाचे ठरले आहे. स्व. अभयसिंहराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्याच्या राजकारणात प्रभावी नेतृत्व निर्माण केले. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी उरमोडी जलाशयाला त्यांचे नाव देणे हा स्थानिक लोकभावनेचा सन्मान मानला जात आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोर्टी गावच्या हद्दीत भराव पुलावरून ट्रक कोसळून दोन तुकडे; लाखों रूपयांचे नुकसान
पुढील बातमी
पर्यटकांना ऐन उन्हाळ्यात थंडावा; महाबळेश्वर येथे वातावरणात लक्षणीय बदल; ऐन उन्हाळ्यातच हिवाळ्याचा फिल

संबंधित बातम्या