मार्डी : मार्डी, ता. माण येथील पवारवाडीमध्ये मारुती शंकर पवार आणि त्यांच्या पत्नी साळुबाई पवार यांच्यावर अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात साळुबाई पवार यांचा जागीच मृत्यू झाला, तर मारुती पवार हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी आणि इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमागील कारण आणि हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध दिशांनी तपास सुरू आहे.
मार्डी येथील पवारवाडीत पती-पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला; पत्नीचा मृत्यू, पती गंभीर
by Team Satara Today | published on : 20 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा